१७ एप्रिलला उलगडणार ‘मिरांडा हाऊस’ चे रहस्य

MIRANDA1

सर्वत्र आयपीएल, मतदानाचे गरमागरम वारे वाहात असतानाच आता प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक ‘मिरांडा हाऊस’ हा रहस्यमय चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयरिस प्रॉडक्शन निर्मित, मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून यात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. त्यामुळे अनेक तर्कवितर्कही काढले जात आहेत. मात्र येत्या १७ एप्रिल रोजी या ‘मिरांडा हाऊस’चे हे रहस्य अखेर उलगडणार आहे. इंग्रजी सबटायटलसह हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून मोठ्या विकेंडचे औचित्य साधून हा चित्रपट दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे.

या आधी राजेंद्र तालक यांनी ‘सावली’, ‘सावरिया.कॉम’, ‘अ रेनी डे’ यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 16 =