Search
Tuesday 29 September 2020
  • :
  • :

ऋचाच्या खाण्यावर होती त्याची नजर

party1

सध्या ऋचा इनामदार तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ऋचाने तिच्या ‘वेडींगचा शिनेमा’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी घडलेला एक विनोदी किस्सा सांगितला. चित्रपटात एक सीन आहे ज्यात शिवराज ऋचाला उचलून पायऱ्या चढून वर मंदिरात नेतो. हा सीन शूट करायच्या आधी दिग्दर्शकांनी शिवराजला विचारले होते की, तू ऋचाला उचलू शकशील ना? तेव्हा तर त्याने हो उत्तर दिले. पण त्यानंतर मात्र शिवराज माझ्यावर पाळत ठेऊनच असायचा. सीन शूट होईपर्यंत शिवराज मी जेवायला किंवा काहीपण खायला बसली की सेटवर कुठेही असला तरी माझ्याजवळ यायचा आणि मला सांगायचा “कमी खा गं, मला तुला उचलायचं”. एकतर मी खूप खवय्यी आहे. खाण्यावर माझे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे न खाता तर मी राहूच नाही शकत. पण हा असं बोलल्यावर मात्र मी ओशाळायचे. असं तो अनेक दिवस करत होता नंतर मला समजले की तो असं बोलून माझी फिरकी घेत होता.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =